Maharashtra Monsoon Assembly Session LIVE : विधानसभा अधिवेशनाचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा
नेमक्या त्याचवेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे त्याठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलत उभे होते. संजय शिरसाट यांना पाहताच धनंजय मुंडे यांच्याही अंगात उत्साह संचारला आणि त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी एक घोषणा दिली. ‘अरे संजय शिरसाटला मंत्रिपदं न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, अशी घोषणा धनंजय मुंडे यांनी दिली. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार याठिकाणी आले तेव्हादेखील मविआच्या आमदारांनी अशाच घोषणा दिल्या. तेव्हा मात्र, शेलार यांनी हजरजबाबीपणा दाखवत मजेत हाच उंचावून विरोधकांच्या बोलण्याला दुजोरा दिला. त्यानंतर शिंदे गटाचे अनेक आमदार विधानभवनापाशी पोहोचले तेव्हा मात्र शिवसेना आक्रमक होताना दिसली. यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी,’आले रे आले, गद्दार आले’, ‘५० खोके आले आले’, अशा घोषणा दिल्या. मात्र, शिंदे गटाच्या आमदारांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे आता सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर पुढे काय घडणार, हे पाहावे लागेल.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. अवघ्या आठवडाभराच्या या अधिवेशनात कामकाजाचे दिवस फार कमी आहेत. मात्र, इतका कमी कालावधी असतानाही अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सत्तापालटानंतर विरोधी बाकांवर बसलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे सरकारच्या मंत्र्यांना अनेक मुद्द्यांवरून घेरले जाईल. या सगळ्याला शिंदे-फडणवीस सरकारेच मंत्री कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.