काँग्रेसमध्ये ‘निष्ठावंत’ वर्गातल्या पहिल्या थरात वावरणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. तसंच, जी-२३ गटाचे प्रमुख नेतेही आझाद आहेत. मगंळवारी काँग्रेस पक्षाने प्रचार समिती तयार केली होती. यामध्ये ११ नेत्यांचा समावेश होता. पक्षाने तारिक हमीद कारा यांची प्रचार समितीचे उपाध्यक्ष तर जीएम सरुरी यांची निमंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गुलाम नबी आझाद यांची प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, या नियुक्त करण्यात आल्यानंतर काही तासांतच आझाद यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. आझाद यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहे. अद्याप पक्षाकडून व गुलाम नबी आझाद यांच्याकडून याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाहीये.
वाचाः
जम्मू- काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुका गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने लढवाव्यात अशी सोनिया गांधींची इच्छा आहे. म्हणूनच त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली हतीय मात्र, आझाद यांनी ही जबाबदारी नाकारल्यानंतर ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्षातील मतभेद उघडपणे समोर आले आहेत. गुलाम नबी आझाद आणि काँग्रेस पक्षातही फूट पडल्याची चर्चा आहे. पक्षात संघटनात्मक बदल व्हावेत यासाठी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांमध्ये त्यांचाही समावेश होता. आझाद यांना राज्यसभेत पुन्हा संधी नाकारल्यानंतर ते नाराज असल्याचं बोललं जात आहे.
वाचाः