aditya thackeray news today, मोदी सरकारच्या रडारावर थेट आदित्य ठाकरे; ५०० कोटींच्या भूखंडाची केंद्राकडून चौकशी – central govt environment department to hold inquiry of land 500 crore to ttd balaji temple which handed over by aditya thackeray in navi mumbai
मुंबई : राज्यात नव्या सरकारमुळे आधीच वातावरण तापलं असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे पहिले पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अशात आता शिंदे आणि शिवसेना वाद पुन्हा चिघळताना दिसत आहे. या सगळ्यात आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, आदित्य ठाकरे केंद्र सरकारच्या रडावर आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय पर्यावरण विभागाने ५०० कोटींच्या एका भूखंडासंदर्भात चौकशीचे आदेश दिल्याचं सांगण्यात येत आहे. आदित्या ठाकरे पर्यावरण मंत्री असताना त्यांनी नवी मुंबईत एका देवस्थानाला दहा एकर भूखंड दिला होता. त्यासंबंधी चौकशी केली जाणार आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती तिरुमल्ला देवस्थानाच्या प्रति तिरुपती बालाजी मंदिरासाठी उलवे नोडमध्ये दहा एकर भूखंड देण्यात आला होता. या दहा एकर भूखंडाची किंमत ५०० कोटी रुपये इतकी आहे. महत्त्वाचं म्हणजे सीआरझेड वन प्रकारातील हा भूखंड देवस्थानाला देऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे याची चौकशी होणार आहे.
राज्यात शिंदे आणि फडणवीसांची सत्ता आहे तर केंद्रात भाजपची सत्ता आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील येणाऱ्या केंद्रीय पर्यावरण विभागाने हे आदेश दिले असून यामुळे भविष्यात आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.
धक्कादायक! घराचं दार उघडताच समोर दिसले ६ मृतदेह, आईसह ३ मुलंही गेली…घडलं तरी काय? पर्यावरण विभागाच्या माध्यमातून हा भूखंड मिळवून देण्यात शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची महत्त्वाची भूमिका बजावली होती. यामध्ये सिडकोने उलवे सेक्टर १२ मधील भूखंड क्रमांक तीनच्या वाढीव एक चटई निर्देशांकाने ४० हजार ४०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड फक्त एक रुपया नाममात्र दराने तिरुपती देवस्थानाला देण्याचा निर्णय घेतला होता. नार्वेकर हे तिरुपती बालाजी देवस्थानाच्या समितीवर विश्वस्त आहेत. त्यामुळे यावेळी त्यांनी यास परवानगी दिली. हा भूखंड देवस्थानच्या ताब्यात देण्यासंदर्भातील पत्र पदाधिकाऱ्यांना देतानाचा फोटो आदित्य ठाकरेंनीच ३० मार्च रोजी ट्विटरवरुन पोस्ट केला होता.