हेही वाचा – Vinayak Mete : विनायक मेटेंच्या पत्नीने ७२ तासांच्या तपासात शोधले धागेदोरे, घात की अपघात; संशय वाढला
समाधान वाघमारे म्हणाले की, ‘जर त्या दिवशी मी गाडीवर असतो तर मी स्वतःचा जीव दिला असता. मात्र, साहेबांना काहीही होऊ दिलं नसतं. मला वाटतं शिक्रापूरच्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले तर यामध्ये बरंच काही मिळू शकतं’. त्यांच्या या विधानामुळे आता या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत गुंतले आहेत? अशा शंका समोर येतात.
समाधान वाघमारे हे विनायक मेटे यांच्याकडे चालक म्हणून काम करत होते. पण, १४ तारखेला त्यांच्या वडिलांचे वर्षश्राद्ध होतं, त्यामुळं ते सुट्टीवर होते. वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्टला ते मेटेंना घेऊन गडबडीत मुंबईच्या दिशेने निघाले होते. यावेळी शिक्रापूरलगत एका इर्टिगा गाडीने दोन वेळा चांगलाच कट मारला. त्यावेळी मी मेटे साहेबांना म्हणालो गाडी थांबवू का? मात्र साहेब म्हणाले ते दारू प्यायले असतील, त्यामुळे तू थांबू नकोस. यावेळी आमची गाडी फक्त ८० च्या स्पीडवर होती. तर गाडीमध्ये मी, मेटे साहेब, बॉडीगार्ड ढोबळे आणि कार्यकर्ता अण्णा मायकर होता,’ अशी माहिती त्यांनी दिली.