पीडित अल्पवयीन असून ती फुग्यांची विक्री करते. या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांना ही सर्व घटना समजताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. सातपूर पोलीस स्टेशनला सर्व घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कारवाई केली. सातपूर पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक उबाळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपी संतोष सोमनाथ चारोस्करला अटक केली आहे.
दरम्यान, संशयित आरोपीवर पोक्सो कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. प्रबुद्ध नगर परिसरात यापूर्वी अशीच एक घटना घडली होती. या भागात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यानंतर आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.