हिनोजोसाच्या वडिलांनी ही रक्कम क्रेडिट युनियन बँकेत जमा केली होती, जी बँक आता बंद झाली आहे. या दरम्यान, हिनोजोसाच्या वडिलांचाही मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर हिनोजोसाने वडिलांच्या सामानासह पासबुकही एका बॉक्समध्ये ठेवले होते.
१२ हजारांचे आता झाले ९.३३ कोटी…
एक दिवस सहज शोधाशोध करताना बऱ्याच दिवसांनी वडिलांच्या डब्यात अचानक हिनोजोसाला पासबुक मिळालं. बँकेत जमा केलेल्या रकमेवर स्टेट गॅरंटी असा शब्द लिहल्याचं त्याने पाहिलं. त्यानंतर, व्याजदर आणि महागाई पाहता, त्याला वाटलं की त्याच्या वडिलांनी ठेवलेली रक्कम आता $ १.२ दशलक्षच्या जवळपास पोहोचली असेल. जर तुम्ही ही रक्कम आत्ताच्या रूपयामध्ये रूपांतरित केली तर ती सुमारे ९.३३ कोटींवर गेली आहे.
न्यायालयाने हिनोजोसाच्या बाजूने दिला निकाल…
ही रक्कम राज्य हमी म्हणून परत मिळावी, असा दावा हिनोजोसा यांनी सरकारकडे केला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. सर्वोच्च न्यायालयाने हिनोजोसाच्या बाजूने निकाल दिला. हिनोजोसाच्या वडिलांनी कठोर परिश्रम करून ही रक्कम जमा केली होती. त्यावर राज्य हमी असेल तर त्यांना ती परत मिळालीच पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे सकारात्मक निकाल लागला तर हिनोजोसाला तब्बल १० कोटी रुपये मिळू शकतात.
हेही वाचा – Vinayak Mete : विनायक मेटेंच्या पत्नीने ७२ तासांच्या तपासात शोधले धागेदोरे, घात की अपघात; संशय वाढला