Dahi Handi utsav 2022 | काही वर्षांपूर्वी जांबोरी मैदानावर सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठानकडून बांधण्यात येणारी दहीहंडी गोविंदा मंडळांच्या आकर्षणाचा विषय होता. आता सचिन अहिर हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. तर आदित्य ठाकरे यांना वरळीतून उभे राहण्यासाठी बाजूला झालेले सुनील शिंदे हेदेखील विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत. विधानपरिषदेचे दोन आणि विधानसभेचा एक असे एकूण तीन आमदार वरळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

हायलाइट्स:
- वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला किंवा गड आहे, असे आम्ही मानत नाही
- शेलार यांनी वरळीतील दहीहंडी उत्सव हायजॅक केला आहे
- शिवसेनेवर दहीहंडीसाठी नवे मैदान शोधण्याची वेळ
दहीहंडीसाठी जांबोरी मैदान मिळवून भाजपने एकप्रकारे आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात घुसखोरी केल्याची चर्चा आहे. काही वर्षांपूर्वी जांबोरी मैदानावर सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठानकडून बांधण्यात येणारी दहीहंडी गोविंदा मंडळांच्या आकर्षणाचा विषय होता. आता सचिन अहिर हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. तर आदित्य ठाकरे यांना वरळीतून उभे राहण्यासाठी बाजूला झालेले सुनील शिंदे हेदेखील विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे विधानपरिषदेचे दोन आणि विधानसभेचा एक असे एकूण तीन आमदार वरळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे वरळीत शिवसेनेची प्रचंड पकड असल्याचे मानले जाते. मात्र, आशिष शेलार यांनी या तिन्ही आमदारांच्या नाकावर टिच्चून दहीहंडीसाठी जांबोरी मैदानाची जागा पटकावल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. यानंतर आशिष शेलार यांनी,’जांबोरी मैदान तो सिर्फ झाकी आहे, पिक्चर अभी बाकी है’, असा नारा देत शिवसेनेला ललकारले होते.
तसेच आम्ही वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला किंवा गड आहे, असे आम्ही मानत नाही. आदित्य ठाकरे शिवसेना-भाजप युतीमुळे निवडून आले आहेत. त्यामुळे वरळी मतदारसंघ हा शिवसेनेचा गड आहे, हे मानण्याचा प्रश्नच येत नाही. कोणता गड कुणाचा, हे शेलार मामांशिवाय कोण ठरवू शकते, अशी टिप्पणीही आशिष शेलार यांनी केली. जांबोरी मैदान भाजपला मिळाल्यामुळे आता शिवसेनेकडून वरळी नाक्याच्या जवळ असणाऱ्या श्रीराम मीलच्या चौकात दहीहंडी उभारला जाणार आहे. हा इव्हेंट यशस्वी करण्यासाठी याठिकाणी शिवसेनेचे प्रमुख आमदार आणि खासदार उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network