गाझीपूर : १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देश स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करत असताना खुनाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे एका आईनेच रागाच्या भरात आपल्या ३ निष्पाप मुलांना विष पाजलं. पण सगळ्यात गंभीर बाब म्हणजे दोन मुलांना रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
सुनीताचे पती बालेश्वर यादवसोबत शुल्लक कारणावरून कौटुंबिक वाद झाला होता. यामुळे रागाच्या भरात तिने पोटत्या लेकरांना विष (एल्यूमीनियम फॉस्फाईड)दिलं. ज्यामध्ये दोन मुलं प्रियांशु (वय ८)-हिमांशु (वय १०)आणि मुलगी सुप्रिया यांचा समावेश आहे तर चौथा मुलाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.