सांगली : जमीन दाखवण्याच्या बहाण्याने अपहरण झालेल्या बांधकाम व्यवसायिकाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माणिकराव पाटील असं या व्यावसायिकाचं नाव असून पाटील यांचा मृतदेह कवठेपिरान येथील वारणा नदीच्या पात्रामध्ये आढळून आला आहे. ही घटना उघड झाल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली.

माणिकराव पाटील यांचे चार दिवसांपूर्वी तुंग येथून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. पाटील यांचे अपहरण आणि खून कोणत्या कारणातून झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

Dahi handi: मानाच्या दहीहंडीसाठी रस्सीखेच, शिवसेनेच्या ३ आमदारांच्या नाकावर टिच्चून भाजपनं जांबोरी मैदान हिसकावलं

नेमकं काय घडलं?

सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात माणिकराव पाटील यांचे सुपुत्र विक्रमसिंह पाटील यांनी अपहरणाची फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला सीसीटीव्ही फुटेजमध्ये जयसिंगपूर या ठिकाणी पाटील यांची गाडी आढळून आली होती. मात्र पाटील यांचा शोध कोठेच लागला नव्हता. त्यानंतर आज सकाळी थेट माणिक पाटील यांचा मृतदेह कवठेपिरान येथील वारणा नदीपात्रामध्ये आढळून आला आहे.

मोहित कंबोजांच्या ट्विटनंतर हालचालींना वेग, ‘ती’ केस पुन्हा ओपन होणार, भाजपकडून अजितदादांना घेरण्याची तयारी?

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून साधारणतः तीन दिवसांपूर्वीच पाटील यांचा खून करून त्यांचा मृतदेह वारणा नदीपात्रामध्ये फेकून दिल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. आता खून आणि अपहरण कोणत्या कारणातून आणि कोणी केले, याबाबतचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here