मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड चित्रपटांना ‘Boycott’चं ग्रहण लागल्याचं दिसून येत आहे. अनेक चित्रपटांना ‘Boycott’ ट्रेंडचा सामना करावा लागलाय. सर्वात मोठा फटका बसलाय आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाला. आमिर खानचा चित्रपट म्हणजे यशाची खात्री असं समिकरण या ‘Boycott’ ट्रेंडमुळं बदललं आहे. या ‘Boycott’ ट्रेंडवर आता सेलिब्रिटी व्यक्त होत आहेत. अभिनेता अर्जुन कपूर यानंही आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कोणत्या ना कोणत्या कारणांमुळं चित्रपटांवर बहिष्कार टाकला जात आहे.सोशल मीडियावर यासाठी मोहिम सुरू केली जाते. याचा थेट परिणाम चित्रपटांच्या कमाईवर होताना दिसत आहे. यावर आता गप्प बसून चालणार नाही, असं मत अर्जुन कपूर यानं व्यक्त केलं आहे.
‘गोदावरी’पाशी निशिकांत कामत सापडला, असं का म्हणतोय जितेंद्र जोशी?
काय म्हणाला अर्जुन कपूर?

अर्जुननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा जो ट्रेंड सुरू आहे त्यावर भाष्य केलं. नेटकऱ्यांकडून कोणतंही कारण नसताना चित्रपटांवर बहिष्कार टाकला जातोय. ही भूमिका आता एक वेगळ्याच वळणावर जात आहे. हे नेमकं का होतंय, कोण करतंय हे कळतही नाही. पण जे लोक हे करत आहेत त्यांना वेळीच थांबवणं गरजेचं आहे. त्यांना आत्ताच धडा शिकवला गेला पाहिजे, असं अर्जुननं म्हटलं आहे.
हा तर आतंकवादी,नथुरामाची औलाद; काँग्रेसच्या महिला नेत्याची शरद पोंक्षेंवर टीका
तसंच आम्ही शांत बसलोय म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा घेऊ नका, बहिष्कार टाकणाऱ्या किंवा ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना अद्दल घडवायला वेळ लागणार नाही, त्यांनी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असंही अर्जुन म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here