नेहानं जिंकली प्रेक्षकांची मनं
फटकळ आणि स्पष्टवक्ती अशी ‘का रे दुरावा’ मालिकेतली रजनी असो, नाहीतर ‘वाडा चिरेबंदी’ नाटकातली चंचल ‘रंजू’, प्रत्येक भूमिकेचा सखोल अभ्यास करणारी, अतिशय सहज संवादफेकीचं कौशल्य असणारी आणि आपल्या टपोऱ्या डोळ्यांतून खोलवर झिरपेल अशी भावना पोहोचवणारी आघाडीची अभिनेत्री नेहा जोशी म्हणजे मालिका-सिनेमे आणि नाट्यवर्तुळातली लोकप्रिय कलावंत.
कितीही लांबीची व्यक्तिरेखा असो, नेहा त्या कलाकृतीमध्ये वेगळी छाप पडून जातेच. ‘वाडा चिरेबंदी’, ‘बेचकी’, ‘कनुप्रिया’ आदी नाटकं आणि ‘झेंडा’, ‘पोश्टर बॉइज’, ‘लालबागची राणी’, ‘बघतोस काय मुजरा कर,’ अशा सिनेमांमधून झळकलेल्या या प्रतिभावान अभिनेत्रीनं
व्यक्तिरेखा किती मोठी आहे यापेक्षा तिला आपल्यातल्या सकस अभिनयानं दर्जेदार करायचं याचं कमालीचं कौशल्य तिच्या अंगी आहे. म्हणून एकाच प्रतिमेत बंदिस्त झाले नसल्याचे ती सांगते.