या राजकीय वादात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या समर्थकांमध्ये अरेरावी झाली. जीमच्या आतच एक तरूणाला तिघांनी मिळून दमदाची करत मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील आठ जणांविरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वाद अनेकदा विकोपाला गेल्याचं पाहायला मिळालं आहे. आता या ठिकाणी पुन्हा नवा वाद समोर आला आहे. थेट जिममध्येच राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं आहे.
आज सकाळी राष्ट्रवादीचे ब्रह्मा माळी हे जिममध्ये होते. यावेळी भाजपाचे पदाधिकारी कुंदन माळी हे आपल्या कार्यकर्त्यांसह जिममध्ये आले. जुन्या राजकीय वादातून कुंदन आणि ब्रह्मा यांच्यामध्ये वाद झाला. अखेर भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. तिघे जण मिळून एकाला मारहाण करताना व्हिडिओत दिसून आले आहे. तर एक व्यक्ती या भांडणामध्ये पडून मारहाण करणाऱ्यांना अडवताना दिसत आहे.