घरात गांजा पिण्यास नकार दिल्यानं एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. परभणीच्या पाथरी शहरातील आदर्श नगरात हा प्रकार घडला. या प्रकरणी पातळी पोलिसांनी तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

तुझ्या घरी कोणी नाही. आम्हाला तुझ्या घरामध्ये गांजा पिऊ दे असे सुनील म्हणाला. सागरने नकार दिल्यामुळे सुनील व त्याच्यासोबत आलेल्या दोन जणांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर सागर त्यांना शिवीगाळ करू नका असे म्हणाला. त्यानंतर सुनील कित्ती घेऊन सागरला मारहाण करण्यासाठी अंगावर जाऊन गेला. झटापटीत सागरच्या हाताला कित्तीचा मार लागला आणि उजव्या डोक्याजवळ मार लागून रक्त निघाले.
सुनीलसोबत आलेल्या दोघानी सागरला खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी सागर पवारने दिलेल्या तक्रारीवरून सुनील चव्हाण आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपासणी पोलीस करत आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.