अखिल भारतीय हिंदू महासभेच्या सदस्यानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना स्वत:च्या रक्तानं पत्र लिहिलं आहे. शाही मशीद ईदगाहच्या आतमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजा करण्याची परवानगी देण्याची मागणी महासभेच्या सदस्यानं केली आहे. १९ ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी असून त्या दिवशी आम्हाला शाही मशिदीत श्रीकृष्णाची पूजा करायची असल्याचं हिंदू महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश शर्मांनी म्हटलं आहे.

कृष्ण जन्मस्थळ आणि शाही ईदगाह वादाशी संबंधित अनेक खटले सध्या न्यायालयात प्रलंबित आहेत. शादी ईदगाह मशीद कटरा केशव देव मंदिराशी संबंधित जमिनीवर उभारण्यात आल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. मुस्लिम पक्षकारांनी या याचिकेला विरोध केला आहे.
मोदी, शहा खंबीरपणे पाठिशी; केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
श्रीकृष्णाचं जन्मस्थान शाही मशीद ईदगाहच्या खाली असल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिण्यात आलेल्या पत्रात करण्यात आला आहे. योगी हनुमानाचा अवतार असल्याचं शर्मांनी पत्रात नमूद केलं आहे. योगी मंदिराच्या आत पूजा करण्याची परवानगी देतील, असा विश्वास त्यांनी पत्रात व्यक्त केला आहे.

ईदगाहमध्ये श्रीकृष्णाच्या जन्माची परवानगी देत नसाल, तर मला मरण्याची परवानगी द्या, असं शर्मांनी पत्रात नमूद केलं आहे. श्रीकृष्णाला त्यांच्या जन्मस्थळावर नमन करण्याची माझी इच्छा आहे. त्याशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही, असं शर्मांनी पत्रात म्हटलं आहे.
भाजपच्या संसदीय समितीतून महाराष्ट्र हद्दपार; गडकरी आऊट, फडणवीसांना स्थान नाही
दिनेश शर्मांनी १८ मे रोजी सिव्हिल जज ज्योती सिंह यांच्या न्यायालयाकडे अर्ज केला होता. शाही मशीद ईदगाहमध्ये बाळकृष्णाला जलाभिषेक करण्याची परवानगी त्यांनी मागितली होती. मात्र न्यायालयानं ३ ऑगस्टला ही याचिका फेटाळून लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here