Bhagyashree Rasal | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Aug 17, 2022, 6:27 PM
ankita lokhande baby bump photos लग्नानंतर अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे दोघे एका नव्या घरात शिफ्ट देखील झाले आहेत. या नवीन घरातील अंकिताचे जबरदस्त फोटोज सुद्धा व्हायरल झाले होते. पण आता एक वेगळीच चर्चा रंगली आहे.

अंकिता आणि विकी सध्या व्हॅकेशन मूडमध्ये दिसत आहे. अंकितानं तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिनं निळ्या रंगाचा डीपनेक फिटेड गाउन घातल्याचं पाहायला मिळतंय. या निळ्या रंगल्या बोल्ड गाउनमध्ये अंकिता नेहमी प्रमाणे सुंदर दिसत असली तरी, चर्चा मात्र तिच्या वेगळ्याच गोष्टीची होतेय. हे फोटो पोहून नेटकऱ्यांनी अंकिता प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावला आहे.अंकिता आणि विकीनं दिलेल्या पोज वरुनही चाहत्यांनी अंकिता गरोदर असल्याचं वाटत आहे. अनेकांनी अंकिता बेबी बंप फ्लॉंट करत असल्याचं म्हटलंय.
दरम्यान, प्रेग्नंसीच्या या चर्चेवर अंकितानं अद्यापही काही उत्तर दिलं नाही. मात्र गेल्या महिन्यातही अंकिता गरोदर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. राखी सावंत हिनं देखील दोघांना गुडन्यूजबद्दल शुभेच्छा दिल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
तर लग्नाला सहा महिने झाल्यानंतर अंकितानं विकीसोबतचे काही खास फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करताना अंकितानं लिहिलेल्या कॅप्शनमुळं ती प्रेग्नंट तर नाही ना असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. तिनं ‘Happy 6 months to us baby’ असं लिहिलं होतं.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network