Eknath Shinde: विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तरे द्या, अजिबात शांत बसू नका. आपलं सरकार कसं चांगलं काम करते आहे, हे लोकांना पटवून सांगा, असे आदेश देतानाच आपण लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे आपलं वर्तन व्यवस्थित असलं पाहिजे. आपल्याकडून कोणतंही चुकीचं वर्तन होणार नाही, याची काळजी घ्या, असा सल्लाही एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील आमदारांना दिला.

कामगारांसाठी असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचं सांगत हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी एका उपहारगृहाच्या व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. उपहारगृहाची पाहणी करण्याकरिता गेलेल्या बांगरांची तेथील जेवणाचा निकृष्ट दर्जा पाहून सटकली अन् त्यांनी उपहारगृह व्यवस्थापकाला थोबडवलं. संतोष बांगर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. या व्हिडीओवर विरोधकांनी आक्षेप नोंदवला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट त्यांच्या स्टाईलने खडसावत “सत्ता आली म्हणजे मस्ती आली का?” असं म्हणत आमदार बांगर यांच्यावर तोंडसुख घेतलं. विरोधकांच्या आक्षेपानंतर मुख्यमंत्र्यांनी आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संतोष बांगर यांना समज दिली.
“विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तरे द्या, अजिबात शांत बसू नका. आपलं सरकार कसं चांगलं काम करते आहे, हे लोकांना पटवून सांगा”, असे आदेश देतानाच “आपण लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे आपलं वर्तन व्यवस्थित असलं पाहिजे. एखादी गोष्ट समाजावून सांगताना ती लोकशाही मूल्ये आणि संविधानिक भाषेत समजावून सांगावी. आपल्याकडून कोणतंही चुकीचं वर्तन होणार नाही, याची काळजी घ्या”, असा सल्लाही एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील आमदारांना दिला.
संतोष बांगरांनी मॅनेजरला थोबडवलं होतं…
आपल्या आडदांड शरीरयष्टी आणि आक्रमक स्वभावासाठी राज्यभर प्रसिद्ध असलेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी कामगारांसाठी असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर तेथील मॅनेजरलाच थोबडवले. उपहारगृहाची पाहणी करण्याकरिता गेलेल्या बांगरांची तेथील जेवणाचा निकृष्ट दर्जा पाहून सटकली अन् त्यांनी उपहारगृह व्यवस्थापकाच्या कानशिलातच लगावली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.
आमदार सुर्वेंचा विरोधकांना इशारा, कार्यकर्त्यांना चिथावणी
मुंबईतले आमदार प्रकाश सुर्वे यांनी विरोधकांना इशारा देताना कार्यकर्त्यांना चिथावणी दिली. गुन्हा दाखल झाला तरी चालेल, पण समोरच्यांना धडा शिकवा, हात नाही तोडता आला तर तंगड्या तोडा… तुमचा जामीन करायला मी इथे बसलोय. काही काळजी करु नका, अशी भाषा वापरली. ज्यानंतर आमदार सुर्वे यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली.