Mohit Kamboj Rashmi Shukla : भाजप नेते मोहित कंबोज आणि आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस, मोहित कंबोज, रश्मी शुक्ला
हायलाइट्स:
मोहित कंबोज फडणवीसांच्या भेटीला
रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राजकीय वर्तुळात चर्चा
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबद्दल ट्विट करुन खळबळ उडवून देणारे भाजप नेते मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. तर, फोन टॅपिंग प्रकरणातील आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या देखील सागर बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. मोहित कंबोज आणि रश्मी शुक्ला हे दोघे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. मोहित कंबोज यांनी काल रात्री सलग तीन ट्विट करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. मोहित कंबोज यांनी आज आणखी दोन ट्विट करत इशारा दिला होता. तर, २०१९ च्या विधानसभा निवडणूक आणि सत्तास्थापनेच्या दरम्यान फोन टॅपिंग केल्याचा आरोप असणाऱ्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्यानं भेटीत नेमकं काय चर्चा होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. बातमी अपडेट होत आहे…