औरंगाबाद: औरंगाबादेत एका तरुणाने प्रेयसीची गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार दुपारी समोर आला होता. पोलिसांनी प्रियकर आरोपी आणि त्याचा कार चालक दोघांना अटक केल्या नंतर या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोमवारी हत्या केल्यानंतर आरोपी प्रेयसीचे मुंडके आणि हाताचे तुकडे औरंगाबादेतून त्याच्या गावी शिऊर येथे घेऊन गेला व तेथे त्याच्या दुकानात ते लपवून ठेवल्याची माहिती समोर आली आहे.

अंकिता श्रीवास्तव असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर सौरभ बंडू लाखे (वय-३०, रा. ता. वैजापूर) असे मारेकरी प्रियकराचे नाव आहे. तर सुनील गंगाधर धनेश्वर वय-२५ असे कार चालकाचे नाव आहे. आरोपी सौरभचे गावात भांड्याचे दुकान आहे. त्याचे लग्न झालेले असून त्याला एक अपत्य आहे. सौरभचे अंकिता सोबत विवाहबाह्य संबंध होते. मात्र अंकिता गेल्या अनेक दिवसापासून लग्नाचा तगादा लावत होती. त्यामुळे सोमवारी झालेल्या वादावादीनंतर आरोपीने औरंगाबादेतील खोलीत प्रेयसीची गळा चिरुन हत्या केली.
कचराकुंडीत सापडले १७ भ्रूण; पाहून स्थानिक हादरले; परिसरात एकच खळबळ
सौरभने अंकिताच्या हत्येनंतर तिचं मुंडकं आणि हात धडावेगळे केले. ते घेऊन तो मंगळवारी गावात गेला आणि दुकानात लपवले. मृतदेहाचे अवयव लपवल्यानंतर गावातील एका राजकीय नेत्याच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमातही तो सहभागी झाला होता. त्यानंतर आज पुन्हा मृतदेहाचे उर्वरित भाग घेण्यासाठी शहरातील हडको भागात पोहोचला.

अंकिताच्या खोलीत जाऊन एका पांढऱ्या रंगाच्या गोणीत त्याने उर्वरित शरीराचे अवयव भरले आणि ती गोणी चारचाकी वाहनात टाकून पुन्हा गावाकडे निघाला. दरम्यान अंकिता राहत असलेल्या खोलीच्या शेजारी राहणाऱ्या महिलेला संशय आला. तिने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर शहर पोलिसांनी ग्रामीण पोलिसांशी समन्वय साधत चारचाकीतून शरीराचे तुकडे घेऊन जाणाऱ्या आरोपी सौरभ आणि त्याच्या चालकाला अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here