राज्यातील सत्तासंर्षात सुरू असलेल्या शिवसेना विरुद्ध शिंदे गटाच्या वादात विधानभवनातील चौथ्या मजल्यावरील शिवसेनेचे कार्यालय सील करण्यात आले होते. हे सील केलेले शिवसेनेचे हे कार्यालय आता पुन्हा एकदा शिवसेनेकडे देण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांचे सरकार महिनाभरापेक्षा जास्त काळ मंत्र्यांच्या प्रतीक्षेत होते. मंत्रीमंडळ विस्तारामुळे बुधवारपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे गटाला सातव्या मजल्यावर स्वतंत्र कार्यालय देण्यात आले आहे. त्यामुळे मूळ शिवसेनेचे चौथ्या मजल्यावरील कार्यालय कायम राहिल्यामुळे चौथ्या मजल्यावर शिवसेनेचे, तर सातव्या मजल्यावर शिंदे गटाचे म्हणजेच स्वयंघोषित शिवसेनेचे कार्यालय राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे विधानसभेत शिंदे गट मूळ शिवसेनेपासून वेगळा झालेला असून, त्यांनी स्वंतत्र प्रतोदही नेमला आणि आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. असे असूनही मूळ शिवसेनेचे विधानभवनातील कार्यालय कायम ठेवून शिंदे गटासाठी सातव्या मजल्यावर स्वतंत्र कार्यालय देण्यात आल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.