Snake Jalna Maharashtra | बैलाला इजा होऊ नये म्हणून शेतकऱ्याचे कुटुंबीय आणि गावकरी मनोमन प्रार्थना करत होते. सुरुवातीला नागाने फणा काढल्यामुळे तो बैलावर हल्ला करेल, असे वाटत होते. पण बराचवेळ तिथे थांबून नंतर बैलाला काहीही इजा न करता नाग निघून गेल्याने नागरिकांमध्ये आश्चर्याची भावना होती. काही ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये ही घटना कैद केली. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हायलाइट्स:
- शेतातील बखारीसमोर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बैलाला बांधण्यात आले होते
- या बैलासमोर चारा टाकण्यात आला होता
- बैलही निवांतपणे चारा खात होता
अंबड तालुक्यातील लोणार भायगाव याठिकाणी हा प्रकार घडला. येथील शेतकरी सोनाजी जाधव यांच्या शेतातील बखारीसमोर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बैलाला बांधण्यात आले होते. या बैलासमोर चारा टाकण्यात आला होता. बैलही निवांतपणे चारा खात होता. त्याचवेळी शेतात एक मोठा नाग आला. हा नाग थेट बैलाच्या समोर येऊन उभा राहिला. या नागाची लांबी जवळपास ५ फुट इतकी होती. या नागाने दंश केल्यास बैलाचा मृत्यू अटळ होता. पण नाग समोर आल्यानंतरही हा बैल जराही डगमगला नाही. बैल शांतपणे जागच्या जागी उभा राहिला. जवळपास २० मिनिटं बैल आणि नाग एकमेकांकडे पाहत होते. ही गोष्ट गावकऱ्यांच्या लक्षात आली. पण गडबड-गोंधळ किंवा काही हालचाल केल्यास नागाकडून बैलाला इजा करण्याची शक्यता होती. त्यामुळे सर्व गावकरी लांब उभे राहून काय घडते, हे पाहत होते. नागाने फणा काढूनही बैल ऐटीत उभा राहिला. जणूकाही त्याने नागाची फारकाही दखल घेतली नाही. बराचवेळ होऊनही बैल नागाला पाहून काही बिथरला नाही. अखेर नाग तेथून निघून गेला आणि गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
बैलाला इजा होऊ नये म्हणून शेतकऱ्याचे कुटुंबीय आणि गावकरी मनोमन प्रार्थना करत होते. सुरुवातीला नागाने फणा काढल्यामुळे तो बैलावर हल्ला करेल, असे वाटत होते. पण बराचवेळ तिथे थांबून नंतर बैलाला काहीही इजा न करता नाग निघून गेल्याने नागरिकांमध्ये आश्चर्याची भावना होती. काही ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये ही घटना कैद केली. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network