enforcement directorate Sanjay Raut | ईडीने बुधवारी मुंबई उपनगर परिसरात छापे टाकले तेव्हा मोठ्या प्रमाणात दस्तावेज जप्त करण्यात आले. या सगळ्याच्या अनुषंगाने आता ईडीचे अधिकारी संजय राऊत यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यावेळी संजय राऊत हे ईडीच्या चौकशीला समाधानकारक उत्तर देऊ शकतात का, हे बघावे लागेल. ईडी आता त्यादृष्टीने तपास करणार आहे.

हायलाइट्स:
- श्रद्धा डेव्हलपर्समध्ये आर्थिक गुंतवणूक असल्याचा संशय
- पुढील तपासात आणखी काही महत्त्वाची माहिती ईडीच्या हाती लागणार का
ईडीने श्रद्धा डेव्हलपर्स आणि संजय राऊत यांच्यातील आर्थिक हितसंबंधांचा तपास केल्यानंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांच्याकडे असलेल्या दोन महागड्या गाड्या या श्रद्धा डेव्हलपर्सने खरेदी केल्याचे समजते. त्यामुळे संजय राऊत यांची श्रद्धा डेव्हलपर्समध्ये आर्थिक गुंतवणूक असल्याचा संशय ईडीला आहे. ईडी आता त्यादृष्टीने तपास करणार आहे. त्यामुळे पुढील तपासात आणखी काही महत्त्वाची माहिती ईडीच्या हाती लागणार का, हे पाहावे लागेल.
ईडीने बुधवारी मुंबई उपनगर परिसरात छापे टाकले तेव्हा मोठ्या प्रमाणात दस्तावेज जप्त करण्यात आले. या सगळ्याच्या अनुषंगाने आता ईडीचे अधिकारी संजय राऊत यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यावेळी संजय राऊत हे ईडीच्या चौकशीला समाधानकारक उत्तर देऊ शकतात का, हे बघावे लागेल. श्रद्धा डेव्हलपर्स आणि संजय राऊत यांच्यात आर्थिक लागेबांधे असल्याचे सिद्ध झाल्यास ईडी आणखी खोलवर जाऊन चौकशी करु शकते. यासाठी ईडीकडून संजय राऊत यांची कोठडी आणखी काही काळासाठी वाढवून मागितली जाऊ शकते. ही बाब संजय राऊत यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
गोरेगावच्या पत्राचाळ पुनर्विकासात ‘ईडी’ने यापूर्वी २ फेब्रुवारीला अटक केलेले प्रवीण राऊत यांचा संबंध असल्याचे समोर आले होते. याद्वारे त्यांनी तब्बल १०७४ कोटी रुपये बेकायदा जमवले. परंतु त्याचवेळी पत्राचाळीचा एक इंचदेखील पुनर्विकास केला नाही, असे ‘ईडी’ च्या तपासात समोर आले होते. हा सर्व पैसा प्रवीण राऊत यांनी त्यांचे मित्र, कुटुंबीय यांच्या विविध खात्यात वळते केले. त्यामध्ये संजय राऊत, त्यांच्या पत्नी वर्षा व अन्य काहींचा समावेश असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. यातूनच ‘ईडी’ने तपास सुरू केला असून या अंतर्गत संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network