Vinayak Mete car accident | गावातील मित्रांनी संदीप वीर यांच्यापाठी लवकर येण्याचा धोशा लावला. त्यामुळे संदीप वीर हे ८०-९०च्या स्पीडने गाडी चालवत होते. त्यांनी अनेक गाड्यांना ओव्हरटेक केल्याची माहिती वीर यांनी स्वत:हूनच पोलिसांना दिली. त्यावेळी रस्त्यात विनायक मेटे यांचीही गाडी होती. या गाडीलाही वीर यांनी ओव्हरटेक केले होते, अशी माहिती पोलीस अधिकारी बलवंत माडगे यांनी दिली.

 

Vinayak Mete car driver
विनायक मेटे

हायलाइट्स:

  • पाच वेळा विधानपरिषद आमदार राहिलेले विनायक मेटे भाजपसोबत युतीमध्ये होते
  • ज्योती मेटे यांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत
  • विनायक मेटे अपघाती मृत्यू
पुणे: शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. विनायक मेटे यांचा नुकताच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune expressway accident) झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला होता. मेटे यांच्या या अपघातापाठी घातपत असल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमवीर काही दिवसांपूर्वी पुण्यात विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीचा पाठलाग झाल्याची नवी माहिती समोर आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. परंतु, आता या गाडीच्या चालकाने स्वत: पोलिसांसमोर हजर होत या सगळ्याबद्दल खुलासा केला.

यासंदर्भात रांजणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलवंत माडगे यांनी माहिती दिली. विनायक मेटे यांच्या गाडीचा पुण्यानजीक पाठलाग झाल्याची माहिती टीव्हीवर दाखवली जात होती. ही कार आमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील होती. त्या गाडीचे मालक संदीप वीर हे सर्व पाहून स्वत:हून पोलीस ठाण्यात आले. त्यांनी आम्हाला ३ ऑगस्टच्या रात्री काय घडले,याची माहिती दिली. संदीप वीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ तारखेला ते रांजणगावहून शिरुरला त्यांच्या भावाच्या वाढदिवसासाठी गेले होते. रांजणगाव ते शिरुर हे अंतर १७ ते १८ किलोमीटर इतके आहे. त्यानंतर संदीप वीर वाढदिवस साजरा करून माघारी परतत होते. ते शिरुर तालुक्यातील भांबर्डे गावातील रहिवाशी आहेत. गावातील मित्रांनी संदीप वीर यांच्यापाठी लवकर येण्याचा धोशा लावला.
विनायक मेटेंच्या भाच्याला वेगळाच संशय, मामाने जागीच प्राण सोडलेले, मग ड्रायव्हर…
त्यामुळे संदीप वीर हे ८०-९०च्या स्पीडने गाडी चालवत होते. त्यांनी अनेक गाड्यांना ओव्हरटेक केल्याची माहिती वीर यांनी स्वत:हूनच पोलिसांना दिली. त्यावेळी रस्त्यात विनायक मेटे यांचीही गाडी होती. या गाडीलाही वीर यांनी ओव्हरटेक केले होते, अशी माहिती पोलीस अधिकारी बलवंत माडगे यांनी दिली.
मी त्याला सतत सांगत होते, माझं साहेबांशी बोलणं करून दे, पण…; ज्योती मेटेंच्या दाव्याने संशयाचं धुकं गडद

विनायक मेटेंच्या अपघाताची CID चौकशी

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि मराठा समाजाचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Death) यांच्या मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पाच वेळा विधानपरिषद आमदार राहिलेले विनायक मेटे भाजपसोबत युतीमध्ये होते. कार चालकाच्या दाव्यावर संशय व्यक्त करत मेटे यांची पत्नी ज्योती मेटे यांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मेटेंच्या मृत्यू प्रकरणाभोवती संशयाचं वलय निर्माण झालं आहे. अखेर राज्य सरकारने दखल घेत हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here