गाडीवरील ताबा सुटला आणि बस घसरली
अवर लेडी ऑफ वेलंकनी या शाळेची बस बुधवारी शाळा सुटल्यानंतर मुलांना घरी सोडण्यासाठी निघाली होती. दरम्यान, नायगाव येथील सनटेक जवळील भागात पोहचताच वाहन चालकाचा अंदाज चुकला आणि बस रस्ता सोडून रस्त्याच्या कडेला घसरली गेली. यावेळी रस्त्याच्या कडेला खोलगट भागामुळे बसचा एका बाजूला तोल गेला आणि बस काहीशी एका बाजूला कलंडली.

५० विद्यार्थी थोडक्यात बचावले
हेही वाचा – बाळाने ‘त्याला’ पप्पा म्हणावं की दादा? पाहा ही महिला काय करुन बसलीये…
बसमध्ये ५० शाळकरी मुलं
यावेळी बसमध्ये जवळपास ५० हून अधिक शाळकरी मुलं होती. बस एका बाजूने कलंडल्याने त्यात असलेली शाळकरी मुलंही घाबरली होती. बस रस्त्यावरुन घसरल्याचं दिसताच परिसरातील नागरीक मदतीला धावून आले. बसमध्ये मुलं अडकून पडली होती. नागरीकांनी तात्काळ आपातकालीन दरवाज्यातून मुलांना बसमधून उतरवलं. त्यामुळे ५० मुलं थोडक्यात बचावले आहेत.
मुलांना बस बाहेर काढून तातडीने दुसऱ्या बसची सोय करण्यात आली. त्यानंतर या बसमध्ये बसवून मुलांना घरी सोडण्यात आले. सुदैवाने बस पुर्णपणे कलंडली नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा- इथे राहू नको सांगितलं ना, तुला कळत नाही का? सासूला भेटायला गेलेल्या महिलेसोबत भयानक कृत्य 93623563
To the esy.es Webmaster, very same here: Link Text