अमरावती : विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावती शहरात यंदा दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. करोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षांपासून सर्व सण समारंभांवर बंधने आली होती. मात्र राज्य निर्बंधमुक्त झालं असून १० लाख रुपयांच्या विमा कवचासह गोविंदांना यंदा दहीहंडी खेळण्यास परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या दहीहंडी उत्सवाला दिग्गज सेलिब्रेटी हजेरी लावणार आहेत.

अमरावती जिल्ह्यात विविध पक्ष संघटना व संस्थांच्या वतीने गाव-खेड्यापासून ते मोठ-मोठ्या शहरांमध्ये दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. आयोजकांनी दहीहंडीच्या उत्साहात भर घालण्यासाठी सिनेतारका, नेते व अभिनेत्यांना आमंत्रित केले आहे. यामध्ये २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या दहीहंडीत शक्ती कपूर, शिव ठाकरे, श्रेयस तळपदे, अभिनेत्री रवीना टंडन, कार्तिक आर्यन, शक्ती कपूर आणि विनोदी अभिनेता कृष्णा हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला वॉशिंग मशीनचं काम करत असेल: बाळासाहेब थोरात

भारतीय जनता पक्षाकडून उद्या १९ ऑगस्ट रोजी आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये सपना चौधरी उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित दहीहंडीत मराठी अभिनेत्या मानसी नाईक तर प्रहार शक्ती संघटनेच्या वतीने आयोजित दहीहंडीत अभिनेता शिव ठाकरे उपस्थित राहणार आहे.

कुटुंब क्षणात उद्ध्वस्त! खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात खाली पडलेल्या दाम्पत्याला डम्परने चिरडले

दरम्यान, आगामी निवडणुका लक्षात ठेवून अनेक राजकीय पक्ष या सिनेतारकांचा आधार घेत आपल्या कार्यक्रमांना गर्दी वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here