Bhagyashree Rasal | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Aug 18, 2022, 1:36 PM

Laal Singh Chaddha News: ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट अपयशी ठरल्यानं आमिर खान खूपच निराश आणि दुःखी झाला आहे. चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर मिस्टर परफेक्शनिस्टनं एक मोठा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं. पण आता निर्मात्यांनीच यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

 

laal singh chaddha updates

हायलाइट्स:

  • लाल सिंह चड्ढा सिनेमाला बॉक्स ऑफिसवर जेमतेम प्रतिसाद
  • प्रेक्षकांनी सिनेमा नाकारल्यानं आमिरला बसला धक्का
मुंबई: विचारपूर्वक निवड करून वर्षातून एखादाच चित्रपट करणारा सुपरस्टार ही आमिर खानची ओळख. ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ची निवड सहसा चुकत नाही. आजवर अनेक चित्रपटांतून ते दिसून आलं; पण नुकताच प्रदर्शित झालेला त्याचा ‘लाल सिंह चड्ढा’ बॉक्सऑफिसवर फार चालला नाही. त्यामुळं लाखो प्रेक्षकांची त्यानं निराशा केली असं बोललं जातंय.

लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फॉरेस्ट गम्प या हॉलिवूड चित्रपटावर आधारित आहे. या चित्रपटाचे हक्क विकत घेण्यासाठी आमिरनं खूप मेहनत घेतली होती. हे हक्क मिळवण्यासाठी त्याला आठ वर्षे लागली. पण आता त्याच्या या मेहनतीला यश आलं नाही, असं चित्र दिसतंय. आमिरच्या जुन्या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहता या चित्रपटाच्या अपयशानं त्याला मोठा धक्का बसला आहे.

लाल सिंह चड्ढा प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर अवघ्या पाच दिवसांमध्ये केवळ ४८ कोटी रुपयांचा गल्ला जमला आहे. बॉक्स ऑफिवर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद न मिळाल्यानं आमिर खूच निराश झालाय. चित्रपट आपटल्यानं आमिर खूपच दुःखी झाला आहे. त्यातच त्यानं चित्रपटाच्या वितरकांना त्यांचे पैसे परत करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं. परंतु आता यासदंर्भात निर्मिती संस्थेकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे.
दागिन्यासारखा मिरवतोय चिखल! सिनेमांनी कोट्यवधींचा गल्ला कमावूनही शेतात राबतायंत प्रवीण तरडे
त्या चर्चा खोट्या
‘लाल सिंह चड्ढा’च्या कमी कमाईमुळं चित्रपटाच्या वितरकांनी नुकसान भरपाईची मागणी केल्याचं म्हटलं जात होतं. मात्र ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत निर्मात्यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. वायकॉम 18 स्टुडिओचे सीईओ अजित अंधारे यांनी चित्रपट तोट्यात जात असल्याच्या चर्चांना तथ्यहीन आणि निराधार म्हटलंय.वितरकांना आमिर पैसे परत करणार असल्याच्या चर्चा खोट्या आहेत. त्यात काहीच तथ्य नाही. खरं तर चित्रपट तोट्यात नाही. आमचं नुकसान झालेलं नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
पाच वर्ष घरातच ठेवलेल्या वडिलांच्या अस्थी, आयुष्याने असेही दिवस दाखवले की…
इतकंच नाही तर वितरकांचे पैसे परत करण्याचा प्रश्नच नाही, कारण या चित्रपचाच्या वितरणासाठी कोणतेही बाहेरचे वितरत नाहीत. आमच्याच कंपनीनं वितरणाची जबाबदारी स्विकारली आहे. यात आमचा तोटा झाला नाही, असंही अंधारे यांनी स्पष्ट केलं.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here