अजित पवारांनी शंभूराजेंना सुनावलं
अजित पवार हे आपल्या कडक आणि रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांच्या याच स्वभावाची आज सभागृहातही प्रचिती आली. ते ओल्या दुष्काळाबाबत बोलत असतानाच मंत्री शंभूराज देसाई हे काहीतरी बोलले. त्यानंतर अजित पवार यांचा पारा चढला. ‘ २००३ ला तत्कालीन आघाडी सरकारने कसा कृत्रिम पावसाचा प्रयोग केला त्याबाबत अजित पवार सांगत होते. यावर शंभूराज देसाई पाऊस चांगला झालाय असं म्हणाले. मात्र सगळीकडे ओला दुष्काळ पडलाय आणि पाऊस जास्त झाला काय म्हणता? आपण एकत्र काम केलं आहे. मध्ये बोलायचं नाही,’ असं म्हणत अजित पवारांनी शंभूराज देसाईंना सुनावलं.
दरम्यान, ‘एकीकडे माणसं मरत आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्याचा दौरा सुरू असून क्रेनने हार घातले जात आहेत. असे सत्कार न करता शांतपणे घ्या अशी सूचना देणं अपेक्षित होतं. शेतकरी संकटात असताना त्याच्या मागे उभा राहणं गरजेचं होतं. यातूनच शेतकऱ्यांना बळ मिळतं. २००३ च्या दुष्काळात आपल्याकडे पाऊस पडत नव्हता, तेव्हा कृत्रिम पावसाचाही प्रयत्न आम्ही केला. तुमचे लोक क्रेनने हार घालून घेतात, अजून शेतकरी अडचणीत आहे, हे वागणं बरं नाही,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली.