डबल डेकर एसी बस

प्रवाशांच्या सोयीसाठी बसमध्ये दोन जिने असतील. तसंच सीसीटीव्ही कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक इंडिकेटरही असतील. या बसचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरिमन पॉईंट, कुलाबा ते वरळी आणि कुर्ला ते सांताक्रूझ असा असेल. इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस मुंबईसाठी गेम चेंजर ठरेल. या डबल डेकर एसी बसचं ५ किलोमीटरपर्यंत कमीत कमी भाडं ६ रुपये असणार आहे. तसंच बसमध्ये ६५ सीट्स असणार आहेत.
एसी बस

या एसी बस सेवेचा उद्घाटन सोहळा आज संध्याकाळी बेस्ट उपक्रमाने एनसीपीए येथील टाटा थिएटरमध्ये आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील. प्रीमियम बसेस ऑफिसला जाणाऱ्यांसाठी आरामदायी प्रवास देईल. बेस्टचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. मागील दोन वर्षात डबल डेकर बसेसच्या संख्येत ६० टक्के घट झाली. २०१९ मध्ये १२० बसेस होत्या, त्या २०२१ मध्ये ४८ वर आल्या आहेत.
मुंबईची दुसरी लाईफ लाइन

मुंबईची दुसरी लाईफ लाइन म्हणून ओळखली जाणारी बेस्ट बस (BEST Bus) अपग्रेड करण्याचा विचार आहे. ही बस लक्झरी असण्यासह भाडंही कमी असणार आहे. बस प्रदूषणरहित (Mumbai Double Decker AC Bus) असेल. या बस अशोक लायलॉन्डच्या सब्सिडरी कंपनी स्विच मॉबिलिटीने बनवलं आहे. वेळ तसंच इंधनासह या बसमुळे ट्रफिकपासूनही मुंबईकरांना दिलासा मिळू शकतो. बेस्टच्या या बसेस ऑफिसला जाणाऱ्या लोकांना टार्गेट करुन तयार करण्यात आल्या आहेत.
इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस

मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी, सुखकर होण्यासाठी BEST च्या ताफ्यात ही इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस सामिल होत आहे. लंडन लूक असणाऱ्या एसी डबल डेकर बस सप्टेंबरपासून मुंबईच्या रस्त्यांवर धावतील. डिसेंबरपर्यंत अशा १०० बसेस सुरू करण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात २०० डबल डेकर बस बेस्टच्या ताफ्यात सामिल होतील. पुढील दोन वर्षात ९०० एसी डबल डेकर बस मुंबईच्या रस्त्यांवर चालतील असा प्रयत्न आहे.
प्रीमियम ॲप आधारित बस

एसी बससह वर्षाअखेरीस २०० प्रीमियम बसेस सुरू करण्याची योजना आहे. ऐन गर्दीच्या वेळी या बसेस कामावर जाणाऱ्यांना फायदेशीर ठरतील. या प्रीमियम बसेसे कुठे पोहोचल्या तेही मोबाईल ॲपद्वारे तपासता येईल. तसंच ओला-उबेरप्रमाणे मोबाइल ॲप वापरुन बसमध्ये सीटही बुक करता येईल. बसमध्ये उभं राहून प्रवास करता येणार नाही. या बसच्या आतील भाग बाहेरच्या इतर खासगी एसी टुरिस्ट बससारखाच असेल. यात पुशबॅक सीट, पडदे, पाय ठेवण्यासाठी पुरेशी जागा असेल. तसंच लॅपटॉप मोबाइल चार्जिंगचीही सोय असेल.