मुंबई : राज्याचे मंत्री आणि मुलुखमैदानी तोफ गुलाबराव पाटील नेहमीच्या आवेशपूर्ण अंदाजात विधान परिषदेत भाषण करत होते. छाती बडवून ते आपला मुद्दा मांडत होते. यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गुलाबरावांना सूचना केली. त्यावर उपसभापती ताई आपण मध्ये बोलू नका… असं म्हणत गुलाबरावांनी नीलम गोऱ्हे यांच्याकडे हातवारे केले. त्यानंतर नीलम गोऱ्हे चांगल्याच संतापल्या. “तुम्ही आताच्या आता खाली बसा. तुमची ही बोलायची पद्धत आहे का? छाती बडवून विधान परिषदेत काय बोलता… बसा खाली… मंत्री असाल तुमच्या घरी….” अशा शब्दात आक्रस्ताळेपणा करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटलांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी झाप झाप झापलं.

शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विधानपरिषदेत शिक्षकांच्या निधीवरुन प्रश्न विचारला. याचविषयी विधानपरिषदेत मग चर्चा सुरु झाली. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना याच विषयावरुन प्रश्न विचारण्यात आला. त्यावर खाली बसून गुलाबराव पाटील काहीसे कुजबुजत होते. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी गुलाबराव पाटील यांना पहिल्यांदा समजावलं. खाली बसून बोलू नका, तुमची वेळ आल्यावर तुमचं म्हणणं मांडा, असं गोऱ्हे म्हणाल्या. त्यावर गुलाबरावांनी मला बोलायचं आहे, असं म्हणत हातवारे केले आणि बोलायला उभे राहिले.

मी मंत्र्याशी बोलतो, तुमच्याशी नाही; भाषणात अडथळा आणणाऱ्या नितेश राणेंना भास्कर जाधवांचा इंगा
“शिक्षणमंत्री एका प्रश्नाला उत्तर देत होते, विरोधीपक्ष नेते म्हणाले की एक मंत्री दादागिरी करत होता, मी त्यावेळी मंत्रिमंडळातील सभासद होतो, अनिल परबांना विचारा ते मंत्री होते, एसटीचा पगार देऊ शकले नाही….” असे मुद्दे आवेशपूर्ण अंदाजात गुलाबराव पाटील मांडत होते. यावेळी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने छातीवर हात वगैरे मारला. हे पाहून नीलम गोऱ्हेंनी भाषणाच्या मध्ये त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. हेच गुलाबरावांना खटकलं.. त्यांनी नीलम गोऱ्हेंना हातवारे करत मध्ये बोलू नका.. असा रागाच्या सुरातच सांगितलं.

गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो चले गुवाहाटी, विरोधकांच्या झोंबणाऱ्या घोषणा, शिंदे गटाच्या आमदारांचा दुसऱ्या दिवशीही पाणउतारा
गुलाबरावांचा आक्रस्ताळेपणा पाहून नीलम गोऱ्हेंना राग अनावर झाला. “सभागृहात बोलण्याची ही पद्धत नाही… परत हात वर करतात की मला बोलायचं आहे आणि माझ्याकडे बघून हातवारे करताय… तुमचं म्हणणं काय आहे रेकॉर्डवर घ्या, तुम्ही कोणाला इशारा करताय…., तुम्ही ताबडतोब खाली बसा आणि तुमचं निवेदन थांबवा, मंत्रीमहोदय ही पद्धत नाहीये, तुमच्या विभागाची निषेध होत नाहीये, मी तुम्हाला ताकीद देते, केसरकरांच्या शिक्षण विभागाचा प्रश्न आहे, तेव्हा तुम्ही कॅबिनेटमध्ये काय करत होता त्याचा आता काय संबंध आणि काय छातीवर हात आपटून वगैरे बोलताय, खाली बसा, ही पद्धत नाहीये वागायची”, अशा शब्दात नीलम गोऱ्हे यांनी गुलाबरावांना सुनावलं.

विधान परिषदेत नेमकं काय घडलं….?

शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी प्रश्न विचारला –

अनुदानास पात्र ठरलेल्या काही शाळांमध्ये त्रुटी होत्या, त्या त्रुटी पुर्तता केलेल्या शाळांच्या याद्या घोषित कराव्या, हा प्रश्न राखीव होता, यावर तत्कालिन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सह्या केल्या, शासन निर्णय निघाला मात्र उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने हा शासन निर्णय निर्गमित होऊ शकला नाही, शासन आदेश जो तयार झाला आहे तो आज निर्गमित करणार का?

केसरकर –

उद्धव ठाकरेंनी राजीनाम्यापूर्वीच त्यावर सही केली. ही फाईल आर्थिक विभागाकडे गेली नव्हती, ते बघावं लागेल, आम्ही याबाबत अत्यंत पॉझिटीव्ह आहोत, लवकर यावर निर्णय घेऊ

त्यानंतर राडा झाला….

जयंत पाटील (शेकाप) म्हणाले…

फायनान्स कडे फाईल पाठवली, म्हणजे मुख्यमंत्र्यांपेक्षा फायनान्स विभाग मोठं आहे का, हे चुकीचं आहे, हे थांबायला हवं ही माझी मागणी……

अनिल परब –

शिक्षणमंत्र्यांनी खूप अभ्यास केलाय असं सांगितलं, उपमुख्यमंत्र्यांकडे फायनान्स होतं, जेव्हा त्यावर मुख्यमंत्र्यांची सही आहे त्यावर पुन्हा निर्णय घेण्याचा अधिकार नाही…..

त्यानंतर सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राडा झाला आणि ५ मिनिटांसाठी सभागृह तबकूब झालं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here