मुंबई: मराठी सिनेसृष्टीत देशपांडे बहिणींची नेहमीच चर्चा असते. ही अभिनेत्री-बहिणींची जोडी म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. विविध माध्यमांतून दोघी जणी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्या दोघीही सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांच्या कामाबद्दलच्या अपडेट्ससह त्या एकमेकींचे भन्नाट व्हिडीओजसुद्धा त्या पोस्ट करत असतात.
गौतमीनं इन्स्टास्टोरीवर एक खास स्टोरी शेअर केली आहे. यात तिनं आयफोन प्रोचा फोटो शेअर केलाय. तर या गिफ्टसाठी मृण्मयीला थॅंक्यू म्हटलं आहे. ही स्टोरी मृण्मयीनं देखील शेअर केली आहे. स्टोरी शेअर करताना तिनं मजेशीर कॅप्शनही लिहिलं आहे. ‘यासाठी आता मला नवीन कामं शोधली पाहिजेत, लई खुट्टा पडलाय’…असं तिनं म्हटलं आहे.
