वाराणसी: तीन दिवसांपूर्वी संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवात देशातील नागरिकांनी तिरंगा घरावर लावून त्यांचा सहभाग नोंदवला. या शिवाय सार्वजनिक ठिकाण मोठ्या प्रमाणात ध्वजारोहण करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण केले. देशभरात स्वातंत्र्य दिनाची ७५ वर्ष जल्लोषात साजरा होत असताना पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

वाचा-

आआयटी (बीएचयु) येथे ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमात देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. पण त्यानंतर पाहुणे गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी थेट आयटम साँन्गवर डान्स सुरू केला. ज्यांनी ‘मा तुझे सलाम’वर घोषणा दिल्या होत्या त्यांनी नंतर भोजपुरी आणि हिंदी चित्रपटातील गाण्यांवर ठेका धरला.

वाचा-

वाचा-

हा प्रकार सुरू असताना तेथे उपस्थित असलेल्या प्रध्यापक आणि अन्य लोकांनी याला विरोध केला. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंगळवारी संस्थेचे डायरेक्टर प्रमोद कुमार यांनी संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here