मुंबई : सणासुदीचे दिवस सुरू झाल्याने अनेक बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. बर्‍याच बँका मर्यादित कालावधीसाठी विशेष ऑफरसह मुदेत ठेवी देखील देत आहेत. रिझर्व्ह बँकेने महिन्याच्या सुरुवातीला रेपो दरात वाढ केल्यामुळेही हे घडत आहे.

देशातील मोठ्या बँका मुदत ठेवींवर विशेष व्याजदर देत आहेत. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि आयसीआयसीआय या बँकांचा समावेश आहे. याशिवाय एचडीएफसी, पीएनबी आणि अॅक्सिससह अनेक बँकांनी एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत. कोणती बँक मुदत ठेवीवर किती व्याज देते ते पाहूया.

वाचा – LIC ग्राहकांसाठी आतापर्यंतची मोठी बातमी, पॉलिसीधारकांसाठी जाहीर केली सूट

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), 30 ऑक्टोबरपर्यंत वैध असलेली ७५ दिवसांची उत्सव ठेव योजना सुरू केली आहे. बँक ६.१० टक्के व्याज दराने मुदत ठेव (फीक्झ्ड डिपॉझिट) ऑफर करत आहे. ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर ६.५० टक्के मिळेल.

वाचा – आता FD वर मिळणार जास्त व्याज; SBI पाठोपाठ आता इंड्सइंड बँकेनेही केली व्याज दरवाढ

बँक ऑफ बडोदा
बँकेने बडोदा तिरंगा ठेव योजना सुरू केली आहे, ज्या अंतर्गत ४४ दिवसांच्या एफडीवर ५.७५ टक्के व्याज दिले जात आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत ५५५ दिवसांच्या एफडीवर ६ टक्के व्याज दिले जात आहे. ही योजना ३१ डिसेंबरपर्यंत २ कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी वैध आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के अतिरिक्त व्याज मिळणार आहे. याशिवाय कॅनरा बँक ६६६ दिवसांच्या एफडीवर ६ टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, पंजाब नॅशनल बँक १,१११ दिवसांच्या एफडीवर ५.७५ टक्के व्याज देत आहे.

वाचा – तुमच्या फॉर्म-१६ मध्ये कर कपातीची संपूर्ण माहिती नाही, काळजी करू नका! अशी करा सुधारणा

खासगी बँकाचे विशेष दर
HDFC ही खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक पाच वर्षांच्या १० दिवसांच्या मुदत ठेवींवर वर ५.७५ टक्के व्याज देत आहे. त्याचवेळी आयसीआयसीआय त्याच कालावधीच्या मुदत ठेवींवर समान परतावा देत आहे. अॅक्सिस बँक १७ ते १८ महिन्यांच्या एफडीवर ६.०५ टक्के व्याज देत आहे.

रिझर्व्ह बँकेने ४ महिन्यांत ३ वेळा रेपो वाढवला
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मे ते ऑगस्ट या कालावधीत रेपो दरात तब्बल १४० बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. अलीकडेच ऑगस्टमध्ये मध्यवर्ती बँकेने रेपो दरात ०.५० टक्क्यांनी वाढ केली होती. तर सध्या रेपो दर ५.४० टक्के आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केलेली वाढ महागाई नियंत्रणासाठी उचललेल्या पावलांमध्ये समाविष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here