सिद्धार्थच्या निधनानंतर कित्येक महिने शहनाज दु:खात बुडाली होती. खास मित्राच्या अचानक जाण्यानं कोलमडून पडलेली शहनाझ आता पुन्हा सावरू लागली आहे. विविध रिअॅलिटी शो, बिग बॉसचा मंच, फॅशन शो इ. ठिकाणी हजेरी लावत स्वत:ला पुन्हा एकदा उभं करण्याच्या प्रयत्नात अभिनेत्री दिसत आहे. तिनं विविध टॉक शो मध्ये सहभागी होत विविध विषयांवरही भाष्य केलं. मात्र अचानक पुन्हा एकदा तिची लव्ह लाइफ चर्चेत आली. एका अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या.
‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटात शहनाझ अभिनेता, डान्सर, कोरिओग्राफर राघव जुयालसह स्क्रिन शेअर करणार आहे. त्यामुळं दोघांना अनेकदा सार्वजनिक ठिकाणीही एकत्र स्पॉट करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी हे दोघे ऋषीकेशमध्ये एकत्र फिरायला देखील गेले होते. त्यामुळं हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं गेलं. पण आता यावर खुद्द शहनाजनं खुलासा केलाय.
शहनाझनं नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रामात मीडिया प्रतिनिधींशी तिनं संवाद साधला. काही मीडिया प्रतिनिधींनी तिला थेट राघवसोबतच्या नात्यावर प्रश्न विचारले. हे प्रश्न ऐकताचा शहनाजचा पारा चढला. ‘मीडिया प्रतिनिधींकडं बोट दाखवत तिनं विचारलं की..तुम्हीही त्यांच्यासोबत उभे आहात…म्हणजे तुमच्या दोघांमध्ये काही सुरू आहे असं समजायचं का? मीडियावर सुरू असलेल्या सगळ्या अफवा आहे. याच्यापेक्षा जास्त काही विचाराल तर आता माझा संताप होईल…असं म्हणत शहनाझनं राघवसोबत डेटींगच्या चर्चा फेटाळल्या.