या प्रकरणी अधिक माहिती अशी की, कन्नड तालुक्यातील करण आणि सागर हे दोन सख्खे भाऊ अग्निवीर भरतीसाठी बुधवारी संध्याकाळी औरंगाबदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दाखल झाले होते. रात्रीच्या दरम्यान मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यावेळी करणने मैदानाचे तीन चक्कर पूर्ण केले होते. चौथे आणि शेवटचे चक्कर पूर्ण करण्यासाठी अवघे पाच फूट अंतर शिल्लक असताना करण अचानक मैदानात कोसळला.
त्याला रात्री दीडच्या सुमारास तातडीने शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून करणला मृत घोषित केले. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या शवविच्छेदन सुरु आहे. नेमके तरुणाचा मृत्यू कसा झाला ते अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
वडिलांचा टाहो.. माझ्या लहान्या मुलाला तरी नोकरीत सामावून घ्या.
मला पत्नी नाही, माझ्या मोठ्या मुलाचा सहरा होता. तो भरती होऊन घराचा संभाळ करेल असे वाटत होते, पण आता तोच राहीला नाही. माझा सहारा गेला. माझ्या लहान मुलाला तरी नोकरीत सामावून घ्या, अशी विनंती मृत तरुणाचे वडील नामदेव पवार यांनी केली आहे.
डोळ्यांदेखत भाऊ गेला
आम्ही दोघेही भरती होण्यासाठी औरंगाबदेत आलो होतो. घरून आणलेली भाकर सोबत खाल्.ली भाऊ म्हणाला होता आपण दोघेही भरती होऊ आणि आपण देशसेवा सोबत करू. पण शेवटच्या राउंडचे काही फूट अंतर शिल्लक होते. माझ्या डोळ्या देखत माझा मोठा भाऊ गेला. मला आई नाही, वडील आजारी असतात आता मी काय करू, असे मृत तरुणाच्या भावाने म्हटले आहे.