पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक मध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकीत प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस बोलत होते.
मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गैरप्रकाराबाबत रुबी हॉल क्लिनिक, पुणे वानवडी येथील इनामदार हॉस्पिटल, ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल येथील डॉक्टर आणि व्यवस्थापन यांची चौकशी करण्यात येईल. दोषी डॉक्टर अथवा व्यवस्थापन यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. ही चौकशी कमीत कमी कालावधीत पूर्ण केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
काही दिवसांपूर्वी सारिका सुतार (वय ३८) या महिलेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने त्यांनी कर्जाची परतफेड करण्यासाठी स्वतःचे मूत्रपिंड (किडनी) अमित साळुंखे यांना देण्याचे कबूल केले. त्यासाठी साळुंखे आणि त्यांची पत्नी सुजाता यांनी सुतार यांना १५ लाख रुपये देण्याचे कबूल करूनही रक्कम दिली नाही. सुतार यांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया २४ मार्चला पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये झाली होती. त्या वेळी गैरप्रकार घडल्याचे कोरेगाव पार्क पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानंतर ‘रुबी’ला नोटीस बजावण्यात आली होती.