Authored by अमोल सराफ | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Aug 18, 2022, 7:12 PM

Buldana Crime News : पशुखाद्याच्या नावाखाली दारू घेऊन जाणारा ट्रक पकडला असता तब्बल ८०० बॉक्स दारू जप्त करण्यात आली आहे. ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.

 

Liquor Smuggling
पशुखाद्याच्या नावाखाली दारू तस्करी; ट्रकची झाडाघडती घेतली असता पोलिसही चक्रावले

हायलाइट्स:

  • पशुखाद्याच्या नावाखाली दारूची तस्करी
  • वाहनाची झाडाझडती केली असता ८०० बॉक्स दारूचे
  • बुलडाण्याती टेंभुर्णानजीक पकडला ट्रक
बुलडाणा : पशुखाद्याच्या नावाखाली दारू घेऊन जाणारा ट्रक मोठ्या युक्तीने पाठलाग करून टेंभुर्णा नजीक पकडण्यात आला असून सदर ट्रकमध्ये तब्बल ५ लाख रुपये किमतीचे दारूचे तब्बल ८०० बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून ट्रकसह दारू साठा जमा करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातून एक ट्रक मोठ्या प्रमाणावर दारू घेऊन नागपूरकडे जात आहे. अशी गुप्त माहिती मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. यावरून मुंबई भरारी पथकाने बुलढाणा व खामगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोबत संयुक्त पथक तयार केले या पथकाने काल मध्यरात्री दोन वाजेच्या दरम्यान पाठलाग करून सीजी ०७ एव्ही ४४७६ क्रमांकांच्या ट्रकला टेंभुर्णा नदीजवळ पकडले.

शासकीय सेवेत आरक्षण आणि १० लाखांचा सहाय्य, मुख्यमंत्र्यांची गोविंदांना मोठी भेट
या ट्रकची तपासणी केली असता काही कट्टे पशुखाद्य होते त्यामागे दारूचे बॉक्स लपवण्यात आले होते. हा ट्रक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात आणण्यात आला. त्यानंतर आज सकाळी ट्रक बाहेर काढण्यात आला असता यात तब्बल ८०० बॉक्स दारूचे मिळून आले. या प्रकरणात ट्रकचालक मोहम्मद हनीफ (वय ५८) याच्याविरुद्ध पुढील कारवाई सुरू आहे. ती दारू नेमकी कुठून आली आणि कोठे नेण्यात येणार होती याचा तपास सुरू असून अवैध दारू विक्रीचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.
Twitter Tips: ‘या’ ट्रिक्सच्या मदतीने सेफ ठेवा तुमचे ट्विटर अकाउंट , हॅकर्स राहतील दूर

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here