मुंबई: बीड जिल्ह्यातील बक्करवाडी येथील महिलेच्या अवैध गर्भपातामुळे झालेल्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नियुक्त करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले. आमदार लक्ष्मण पवार, डॉ. भारती लव्हेकर, नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

बक्करवाडी प्रकरणात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र याप्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात येईल. बीड जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांची पीसीपीएनडीटी कायद्यातील तरतुदीनुसार तपासणी करण्यात येईल. या तपासणीत दोषी आढळणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांवर कारवाई केली जाईल, असे डॉ.सावंत यांनी सांगितले. याबाबतच्या चर्चेत सदस्य राजेश टोपे, देवयानी फरांदे, आशिष शेलार, प्रकाश सोळंके यांनी सहभाग घेतला.

ठाकरेंना सोडचिठ्ठी दिलेले बंडखोर आमदार अजितदादांच्या निशाण्यावर, एकेकाची शाळा घेत गप्पगार केलं!

बक्करवाडी येथील अवैध गर्भपात प्रकरणावरुन महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी चांगलाच गदारोळ उडाला. बीड जिल्ह्यातील भाजपचे ३ आमदार याच बक्करवाडी प्रकरणावरुन चांगलेच आक्रमक झाले. या प्रकरणावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना उत्तर द्यावं लागलं. या प्रकरणाचा पुन्हा एकदा विशेष तपास केला जाईल तसेच हे प्रकरण विशेष जलदगती न्यायालयात चालवलं जाईल, अशी घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली.

बीडचं बक्करवाडी प्रकरण…?

अवैध गर्भपात आणि गर्भलिंग तपासणी प्रकरणांमध्ये, बीड पोलिसांना यश आले आहे. औरंगाबादमधून गर्भलिंग निदान करणाऱ्या शिकाऊ डॉक्टरच्या मुसक्या आवळण्यात बीड पोलिसांना यश आलंय. सतीश बाळू सोनवणे असं अटक करण्यात आलेल्या शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे. बीडच्या बक्करवाडी येथील शीतल गाडे वय 30 या महिलेचा, अवैध गर्भपात करताना 5 जून रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणात बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात मृत शितल गाडे यांच्या पतीसह सासरा , भाऊ आणि तर 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील आरोपी सीमा डोंगरे हिचा पाली येथील तलावात मृतदेह आढळून आलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here