या प्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कासारे यांच्या ताब्यात सुमारे सात एकर जमीन आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून् ती जमीन करत आहेत. याच जमिनीवरून गावातील एका परिवारासोबत कासारे यांचा वाद होता. गेल्या १२ ते १३ वर्षांपासून हा वाद सुरु होता. यापूर्वी देखील हे वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते. त्यातील एक प्रकरण न्यायालयात सुरु आहे. त्या प्रकरणाची येत्या आठ दिवसात सुनावणी होती. दोन्ही परिवारात अनेकदा वाद झाला.
आज कासारे हे शेतात काम करत असताना आरोपी तेथे आले. त्यांनी कासारे यांच्या सोबत वाद केला व त्यातील एकाने धारदार कुऱ्हाडीने कासारे यांच्या डोक्यावर वार केला. डोक्याला जबर मार लागल्याने कासारे रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले. त्यानंतर मारेकरी तेथून पसार झाले. बायको आणी मुलाने जखमी अवस्थेत कासारे यांना रुग्णालयात नेऊन गेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ही घटना वाऱ्यासारखी शहरात पसरल्यानंतर विविध पक्ष, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय घाटी रुग्णाल्यात धाव घेतली होती. त्यामुळे घाटीत मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणी चिखलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.