परभणी शहरातील महात्मा गांधी नगर मध्ये राहणाऱ्या शेषराव प्रधान यांना एका प्रकरणामध्ये वॉरंट आले होते. त्यामुळे संबंधित महिलेला पोटगीचे पैसे द्यायचे होते. त्यामुळे सेवक नगरामध्ये असलेले प्लॉट विकू दे, असे शेषराव प्रधान हे आपल्या पत्नीला सांगत होते. यावेळी पत्नीने प्लॉट विकण्यास विरोध केला. या वरून पती-पत्नीमध्ये वाद होत होता. १७ ऑगस्ट रोजी हा वाद अधिकच वाढला. यात वादादरम्यान शेषराव प्रधान याने पत्नीशी वाद घालून तिच्या तोंडावर सिमेंटचा गट्टू मारला.
सिमेंटचा पेवर ब्लॉक लागून जखमी झालेल्या मंगल प्रधान यांना परभणी शहरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. याची माहिती मुलगा नितीन प्रधान यांने आपले मामा चेतन लाटे यांना दिली. ते परभणी शहरामध्ये दाखल झाले. मात्र मंगल प्रधान यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे दाखल करण्यात आले. नांदेड येथे उपचार सुरू असताना त्यांना पुन्हा परभणी येथे आणण्यात आले. उपचारादर मंगला प्रधान यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी गुरुवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी मृत मंगल प्रधान यांचे भाऊ चेतन लाटे यांनी नाणेलपेठ पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शेषराव प्रधान यांच्या विरोधात कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.