यवतमाळ : जिल्ह्यातील वणी तालुक्यातील नायगाव (बु) येथे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेवर २२ वर्षीय माथेफिरूने चाकूने हल्ला केला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. हल्ल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच आरोपी राजू अन्सारी याला शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वैशाली चल्लावार (४०) असे हल्ल्यात जखमी झालेल्या शिक्षिकेचं नाव आहे.

वणी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नायगाव (बु) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वैशाली चल्लावार या कार्यरत आहे. त्या आपल्या परिवारासह चंद्रपूरला येथे वास्तव्यास आहे. सदर शिक्षिका अध्ययनाचे कार्य पार पाडून शाळा सुटल्यावर आपल्या गावी चंद्रपूर येथे जाण्यासाठी निघाली होती. ती शिक्षिका नायगाव फाट्यावर बस किंवा अन्य प्रवासी वाहनांची वाट पाहत असताना अचानक एका माथेफिरू युवकाने तिच्यावर चाकूने हल्ला चढवला.

‘त्या’ प्रकरणी मी दोषी नाही, माझ्यावरील आरोप निराधार व खोटे; संजय राऊतांचा बचाव

या हल्ल्यात वैशाली चल्लावार यांच्या कानाला जखम झाली आहे. त्या जखमी झाल्याचे नागरिकांना कळताच तिला घुग्गुस येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी हलवण्यात आले.

‘त्या’ प्राचार्यांवर अखेर अॅट्रोसिटीचा गुन्हा; विद्यार्थ्यांचा जातिवाचक उल्लेख, अश्लील भाषेचा वापर

दरम्यान, हल्लेखोर माथेफिरू युवक स्वतःचे नाव राजू अन्सारी सांगत असून त्याच्या जवळ नावाबाबत ठोस पुरावा आढळून आला नाही. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं असून त्याने चाकू हल्ला का केला, हे अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. रामेश्वर कंदुरे पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here