konkan news, Sindhudurg News : कोकणात किनारपट्टी भागात सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, सर्व हॉटेल्स-लॉजची तपासणी सुरू – konkan news all the hotels in the coastal area of sindhudurg district are on alert
सिंधुदुर्ग : हरेश्वर श्रीवर्धन इथे समुद्रकिनारी सापडलेल्या बोटीच्या तसेच दिघी भरतखोल इथे लाईफ तराफा मिळाल्याच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व हॉटेलची तपासणी करण्यात येत आहे. वेंगुर्ले हद्दीतील लँडिंग पॉईंट आणि कोस्टल पॉईंट इथे पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला असून समुद्रकिनारी असलेले सर्व हॉटेल/लॉजेस चेकिंग सुरू आहे. स्थानिक मच्छीमार, सागररक्षक दल सदस्यदेखील सतर्क करण्यात आले आहेत. संशयित हालचाल दिसून आल्यास तात्काळ पोलीस ठाण्यास माहिती देण्याबाबत वेंगुर्ले पोलिसांनी आवाहन केले आहे.
किनारपट्टीवर बोटिंगची व गाड्यांची कसून तपासणी हरेश्वर श्रीवर्धन इथे समुद्रकिनारी मिळून आलेल्या बोटीच्या अनुषंगाने, तसेच दिघी भरतखोल इथे लाईफ तराफा मिळाल्याच्या अनुषंगाने वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व हॉटेल लॉजेस चेक करण्यात आलेली आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.
वेंगुर्ला हद्दीतील लँडिंग पॉईंट व कोस्टल पॉईंट येथे पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला असून समुद्रकिनारी असलेले सर्व हॉटेल/लॉजेस चेकिंग सुरू आहे. स्थानिक मच्छीमार, सगररक्षक दल सदस्य आणि वारडन यांनादेखील सतर्क करण्यात आलेले असून संशयित हालचाल दिसून आल्यास तात्काळ पोलीस ठाण्यास माहिती देण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.
दरम्यान, आम्ही स्वतः समुद्रातून येणाऱ्या बोटी बंदरावर चेक करीत आहोत. तसेच बोटीवर कामास असलेले खलाशी व बाहेरील राज्यातील इसम यांची चौकशी करीत आहोत, अशी माहिती जाधव यांनी दिली.