pune girl case, पुण्यात धक्कादायक प्रकार; नग्न अवस्थेत तरुण घरात घुसला अन् थेट महिलेशेजारी जाऊन झोपला – shocking incident in pune; the young man entered the house naked and slept near woman
पुणे : पुण्यातील येरवडा भागात एक अत्यंत संतापजनक अन् किळसवाणा प्रकार घडला आहे. एक तरुण नग्न अवस्थेत घरात घुसून थेट महिलेच्या शेजारी जाऊन झोपला. यासंबंधी ३२ वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी विकृत आरोपीला अटकही केली आहे. अरूण लहू गालफांडे (वय २४, रा. यशवंतनगर, येरवडा) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरूण हा रिक्षा चालक आहे. तो दिवसभर रिक्षा चालवितो. तो या परिसरात राहणारा असून अविवाहित आहे. अरुण हा तक्रारदार महिलेच्या ओळखीतलच आहे. दरम्यान, पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास अरूण हा नग्न अवस्थेत तक्रारदार महिलेच्या घरात शिरला. तसंच, तक्रारदार यांच्या शेजारी जाऊन झोपला. तक्रारदार महिलेला अचानक जाग आल्यानंतर त्यांनी पाहिले असता त्या भीतीपोटी ओरडतच बाहेर पळत आल्या. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. मात्र तोपर्यंत अरूण हा पसार झाला होता. पोलिसांनी सिनेस्टाईल केला कारचा पाठलाग, गाडी उघडताच हाती लागलं मोठं घबाड
महिलेने पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पसार झालेल्या अरूणला महिला उपनिरीक्षक दर्शना शेलार व त्यांच्या पथकाने गुरूवारी दुपारी अटक केली. त्याने नशा केली होती का, याबाबत पोलीस तपास करत आहेत. यापूर्वीही त्याने अशा प्रकारचे कृत्य तीन महिलांसोबत केले आहे. याबाबत महिलांनी पुरावे देखील दिले आहेत. आरोपी अरुण गालफांडे हा परिसरात बीभत्स अवस्थेत फिरत असल्याचे आढळून आलं आहे. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.