Shivsena Maharashtra Politics | आदित्य ठाकरे यांचा राजकारणातील लाँचिंग पॅड ठरलेल्या युवासेनेचे (Yuvasena) नेतृत्त्व तेजस ठाकरे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. ठाकरे घराण्याचे वलय असल्यामुळे तेजस ठाकरे तरुण मतदारांना आकर्षिक करू शकतात, असा कयास आहे. त्यामुळे आता शिवसेना तेजस ठाकरे यांच्याबाबत मोठी घोषणा कधी करणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. युवाशक्ती तेजस ठाकरे.

हायलाइट्स:
- यंदा तेजस ठाकरे यांचा फोटो ठळकपणे झळकताना दिसत आहे
- ठाकरे घराण्यातील तीन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणारे चार नेते
- तेजस ठाकरे मैदानात उतरण्याची शक्यता
मुंबईच्या गिरगाव परिसरात दहीहंडीनिमित्त शिवसेनेकडून लावण्यात येणाऱ्या बॅनर्सवर यंदा तेजस ठाकरे यांचा फोटो ठळकपणे झळकताना दिसत आहे. ठाकरे घराण्यातील तीन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणारे चार नेते या बॅनर्सवर आहेत. यामध्ये बाळासाहेब यांचा उल्लेख ‘हिंदुहदयसम्राट’, उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘कुटुंबप्रमुख’ तर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचा उल्लेख अनुक्रमे ‘युवानेतृत्त्व’ आणि ‘युवाशक्ती’ म्हणून करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात तेजस ठाकरे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेनेने आतापासून वातावरणनिर्मिती करायला सुरुवात केल्याचे चर्चा आहे.
आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणात आपले बस्तान बऱ्यापैकी बसवले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची कामगिरी समाधानकारक होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील अनेक जुणेजाणते नेते निघून गेल्यामुळे भविष्यात आदित्य ठाकरे यांना शिवसेनेत आणखी मोठी जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागणार आहे. अशा परिस्थितीत आदित्य ठाकरे यांचा राजकारणातील लाँचिंग पॅड ठरलेल्या युवासेनेचे नेतृत्त्व तेजस ठाकरे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. ठाकरे घराण्याचे वलय असल्यामुळे तेजस ठाकरे तरुण मतदारांना आकर्षिक करू शकतात, असा कयास आहे. त्यामुळे आता शिवसेना तेजस ठाकरे यांच्याबाबत मोठी घोषणा कधी करणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network