Devendra Fadnavis in National Politics: देवेंद्र फडणवीस हे अत्यंत कुशल राजकीय व्यक्तीमत्व आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे भविष्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपला सक्षम नेतृत्त्व देऊ शकणाऱ्या नेत्यांमध्ये जी काही दोन-तीन नावं आहेत, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

हायलाइट्स:
- देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रीय राजकारणाचे वेध
- पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी
- अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून लॉबिंग
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने जे.पी. नड्डा यांना पाठवलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत कुशल राजकीय व्यक्तीमत्व आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे भविष्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपला सक्षम नेतृत्त्व देऊ शकणाऱ्या नेत्यांमध्ये जी काही दोन-तीन नावं आहेत, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एका महिन्यापूर्वी त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास भाग पाडण्यात आले. त्यावेळी फडणवीस यांना एक पाऊल मागे यावे लागले असले तरी हा प्रारंभ आहे. भाजपचा हा निर्णय योग्य मानला जाऊ शकतो, असे या पत्रात म्हटले आहे.
पत्रात आणखी काय म्हटलंय?
पुण्यातील ब्राह्मण महासंघ २००९ साली काँग्रेसचे सुरेश कलमाडी, २०१४ साली अनिल शिरोळे आणि २०१९ मध्ये गिरीश बापट यांच्या पाठिशी उभा राहिला. याचे परिणाम तुमच्यासमोर आहेत. राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्त्वासाठी देवेंद्र फडणवीस हे अत्यंत सुरक्षित नेते आहेत. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही. मात्र, आम्ही राष्ट्रहिताला प्राधान्य देतो. अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस भाजपच्या वैभवशाली नेतृत्त्वाची परंपरा कायम ठेवतील, असा विश्वास पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network