shinde faction banner, थरामुळे नाही तर मुख्यमंत्री शिंदेंची दहीहंडी राज्यभरात चर्चेत, बघा काय आहे कारण… – shinde faction banner in tembhi naka dahi handi criticize uddhav thackeray
ठाणे : गोपाळकाला निमित्त ठाण्यात आज विविध ठिकाणी दहीहंडी ( Dahi Handi 2022 ) उभारण्यात आल्या आहेत. ठाण्यातील टेंभी नाक्याची दहीहंडी मनाची हंडी म्हणून ओळखली जाते. शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांनी ही टेंभी नाक्याची हंडी सुरू केली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही दहीहंडी उभारण्यात आली आहे. मात्र, टेंभी नाक्यावर थेट उद्धव ठाकरेंविरोधात ( Uddhav Thackeray ) बॅनरबाजी करण्यात आलेली पाहायला मिळाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आणि त्यांच्या वक्तव्यातून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे.
टेंभी नाका दहीहंडीच्या ठिकाणी अनेक बॅनर लावण्यात आले आहेत. “मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, कधीच नाही”, “मतदानाच्या वेळी शिव्या द्यायच्या, आणि नंतर त्यांच्याबोबरच आघाडी करायची” “शिवसेनेला जागा कमी पडत असतील तर NCP सोबत जाणार का? NEVER – NEVER शत्रू हा शत्रूच असतो”, “आज जो मानसन्मान मिळतोय तो या हिंदुत्वामुळे आहे, भगव्या झेंड्यामुळे”, “गर्व से काही हम हिंदू है”, अशा आशयाचे अनेक बॅनर्स टेंभी नाका परिसरात लावण्यात आले आहेत. या बॅनरवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि त्यांची स्वाक्षरी नमूद करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे.
थरामुळे नाही तर मुख्यमंत्री शिंदेंची दहीहंडी राज्यभरात चर्चेत
या बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेच्या शिंदे गटाकडून ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. या बॅनरबाजीमधून सोडलेल्या टीकास्त्रमुळे शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात पुन्हा वाद चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता उत्सवांना सुरुवात झाली आहे. लवकरच गणेशोत्सवही येत आहे. त्यानंतर नवरात्री आहे. यामुळे ठाण्यात उत्सवाच्या माध्यमातून राजकारण अधिक तापणार अशी चिन्ह आहेत.