अमरावती : युनियन बँक ऑफ इंडियाच्या राजापेठ शाखेत सोने तारण ठेवून कर्ज योजनेतील ५९ ग्राहकांचे सुमारे ३ कोटी रुपयांचे खरे सोने गायब होऊन त्याठिकाणी नकली सोने आल्याची धक्कादायक बाब बँकेच्याच ऑडिटमध्ये समोर आली आहे. या बँकेत सुमारे दोन महिन्यांपूर्वी बेलपुरा परिसरातील एका ग्राहकाच्या खात्यात अचानकपणे साडेसहा लाख रुपये आलेत. मात्र, त्याच दिवशी काही वेळात ती रक्कम त्याच्या खात्यातून दुसऱ्या खात्यात वळती झाली.

याबाबत संबंधित खातेदाराला मेसेज सुध्दा आला नाही. मात्र, अलीकडेच त्या व्यक्तीने पासबुकवर एन्ट्री घेतली असता हा प्रकार समोर आला व त्याने १५ ऑगस्टला पोलिसांना याबाबत माहिती दिली. या घटनेत सातत्याने नवनवीन खुलासा समोर येत आहे. हे खरे सोने गेले कुठे? यासोबतच आणखी काय घोळ आहे? याचा शोध पोलीस घेणार आहेत.

Dolo 650 Uses: तापावर डॉक्टरांनी तुम्हाला दिली होती का Dolo-650? समोर आले धक्कादायक सत्य
राजापेठ पोलिसांनी या प्रकरणात १२ ऑगस्टला गुन्हा दाखल केला. त्यावेळी एकच तक्रारदार पोलिसांपर्यंत आला व त्या ग्राहकाचे १०० ग्रॅम खरे सोने बनावट झाले होते. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून बँक व्यवस्थापनाला या प्रकरणात माहिती मागितली होती. त्यामुळेच बँकेने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ५९ खात्यातील ५ किलो ८०० ग्रॅम सोन्यामध्ये हेराफेरी झाली असून ते बनावट झाले आहे.

प्रचंड विश्वास ठेवूनच ग्राहक त्यांच्या जवळील रक्कम किंवा सोने बँकेत ठेवतात. मात्र, युनियन बँकेसारख्या राष्ट्रीयकृत बँकेत झालेला हा प्रकार सर्वसामान्य ग्राहकांसाठी प्रचंड धक्कादायक आहे. बँकेने संपूर्ण व्यवहारांचे ऑडिट सुरू केले असून त्यामुळे सोने तारण कर्ज प्रकरणातील घोळाशिवाय अन्य काही घोळ आहे का? असल्यास ते सुध्दा बाहेर येणार आहेत. दरम्यान, राजापेठ पोलिसांनी सदर प्रकरण आर्थीक गुन्हे शाखेकडे वर्ग केले असून प्रकरणाचे कागदपत्र आर्थीक गुन्हे शाखेकडे पोहोचले आहेत. त्यामुळे आता आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

पोलिसांनी सिनेस्टाईल केला कारचा पाठलाग, गाडी उघडताच हाती लागलं मोठं घबाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here