Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Aug 19, 2022, 4:00 PM
Weather alert : पुन्हा एकदा हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा, नाशिक आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत मध्यम पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

हायलाइट्स:
- हवामान खात्याकडून पावसाचा इशारा
- पुणे, सातारा, नाशिक आणि विदर्भात मध्यम पावसाची शक्यता
पुणे, सातारा, नाशिक परिसरातील ढगांची दाटी बघायला मिळाली असून विजांचा कडकडाट होत आहे. पुढील ३-४ तासांत पुणे सातारा नाशिकमध्ये मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई ठाण्यात काही भागांत ढगाळ वातावरण तर काही भागांत हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गडचिरोलीमध्ये धुवांधार पावसाने पूर परिस्थिती…
गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत असल्याने नदी-नाल्यांना पूर आला असून तब्बल २० मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पुरामुळे भामरागड येथील १५० आणि देसाईगंज येथील हनुमान वॉर्डातील ४३ अशा एकूण १९३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी एका मदत केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ७५ कच्ची घरे आणि २ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network