धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवनांद्रा शिवारात घडली आहे. दुचाकीने पेट घेतला असल्याची माहिती पाठीमागून येणाऱ्या नागरिकांनी चालकाला सांगितल्यानंतर त्याने गाडी रस्त्यावर टाकून बाजूला पळ काढला.

दुचाकीने पेट घेतल्याचे समजताच इंद्रजीत कांबळे यांनी दुचाकी रस्त्यावर फेकून देऊन बाजूला पळ काढला. त्यामुळे ते थोडक्यात बचावले. या घटनेत जीवित हानी झाली नसली तरी दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील नागरिकांनी शेतातून पाणी आणून दुचाकीला लागलेली आग विझवली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान मागील काही दिवसापासून परभणी जिल्ह्यामध्ये दुचाकी पेट घेण्याच्या घटना वाढल्या आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.