Bhagyashree Rasal | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Aug 19, 2022, 5:04 PM

shraddha kapoor at thane dahi handi राज्यभर दहीहंडी उत्सव साजरा होता आहे. अनेक ठिकाणी दहीहंडी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. राजकीय पक्षांच्या मोठ्या दहीहंडींच्या यंदाची चर्चा आहे. दरवर्षीप्रमाणं अनेक सेलिब्रिटी मंडळी दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी झाले आहेत.

 

shraddha kapoor at dahihandi
ठाणे: कसं काय ठाणेकर… तुम्हा सर्व ठाणेकरांना नमस्कार असं म्हणत बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिनं ठाणेकरांची मनं जिंकली. ठाण्यातील टेंभी नाका परिसरात आयोजित दहीहंडी उत्सवाला तिनं हजेरी लावली. या दहीहंडी उत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.
ब्रेन डेड नाही तर कोमात आहेत राजू श्रीवास्तव, कॉमेडियन अजून बेशुद्धच; मेंदूलाही सूज
धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुढाकारानं सुरू झालेली ठाण्यातल्या टेंभीनाका इथल्या दहीहंडीची दरवर्षी चर्चा होते. यंदा देखील इखं गोविंदा पथकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. टेंभीनाका इथल्या दहीहंडीशी मुख्यमंत्र्यांचं खास नातं आहे. या वेळी त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली. यावेळी अभिनेत्री श्रद्धा कपूरही तिथं उपस्थित होती.
म्हणून ललित प्रभाकर त्याच्या पहिल्या भूमिकेविषयी कधीच बोलत नाही… असं काय केलं होतं काम?
श्रद्धानं दहीहंडी उत्सवाला फक्त हजेरी लावली नाही तर, खास मराठीत भाषणही केलं. तिनं ठाणेकरांना मराठी भाषेत दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. तिचा अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

काय म्हणाली श्रद्धा?
श्रद्धानं माईक हातात घेतला आणि मराठीत बोलायला सुरुवात केली. कसं काय ठाणेकर… तुम्हा सर्व ठाणेकरांना नमस्कार ..असं म्हणत तिनं सगळ्यांची मनं जिंकली. दहीहंडीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत आहेत, यापेक्षा जास्त आपल्याला काय पाहिजे…? दिघे साहेबांची दहीहंडी खूप मोठी असते, हे नेहमीच ऐकलंय, पण आज ते प्रत्यक्षात पाहिलं. तुम्ही मला इतकं प्रेम देता त्यासाठी मी तुमची आभारी आहे’, असं श्रद्धा म्हणाली.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here