इंडियन फ्रीडम फाऊंडेशननं याबद्दल जास्त माहिती दिली आहे. आयआरसीटीसी यासाठी एका सल्लागाराची नियुक्ती करणार आहे. वापरकर्त्यांचा डेटा मॉनिटाईझ करण्याच्या पद्धतींबद्दल सल्लागार आयआरसीटीसीला मदत करतील. आयआरसीटीसीकडे वापरकर्त्यांचा १०० टीबीहून अधिक डेटा आहे. तिकीट बुक करणाऱ्यांच्या नावांपासून त्यांच्या फोन नंबरपर्यंतची माहिती आयआरसीटीसीकडे आहे.
सरकार तुमची गोपनीय माहिती विकणार?
या प्रश्नाचं हो किंवा नाही इतक्या नेमकेपणानं देणं अवघड आहे. कंपनी डेटावरील आपलं नियंत्रण कधीही सोडणार नाही. याचा अर्थ आयआरसीटीसीकडे असलेला तुमचा डेटा कधीही विकला जाणार नाही. आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून हेच स्पष्ट होत आहे. कारण डेटा विकून केवळ एकदाच कमाई होते. आयआरसीटीसीनं यापुढची योजना आखली आहे. कंपनी वेळोवेळी डेटाचा वापर पैसे कमावण्यासाठी करेल.
तुम्ही ट्रेनमधून प्रवास करताना आयआरसीटीसी त्यांच्याकडे असलेल्या तुमचा तपशील वापरेल. प्रवासी रेल्वेत असताना ई-कॅटरिंगचा वापर करतात. या प्रवाशांना यापुढे प्रवासात ई-कॅटरिंग कंपन्यांची नोटिफिकेशन येऊ शकतात. आयआरसीटीसीचा वापर अनेक जण ट्रेनचं तिकीट बुक करण्यासाठी करतात. ट्रेनमधून उतरल्यानंतर प्रवासी स्टेशनहून घरी जाण्यासाठी कॅबचा वापर करतात. त्यामुळे यापुढे प्रवाशांना कॅबचे नोटिफिकेशन किंवा सजेशन येऊ शकतात. यासाठी आयआरसीटीसी थर्ड पार्टीसोबत वापरकर्त्यांचा डेटा शेअर करेल आणि त्यातून पैसे कमावेल.