परभणी : राज्यभरात दहीहंडीचा उत्साह असताना परभणीतील सिंगणापूर येथे दारू पिताना वाद झाल्यामुळे केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटनाघडली आहे. दारू पिताना झालेला हा वाद जाग्यावरच मिटवल्यानंतर घराकडे जात असतांना दुचाकी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केल्यामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. गोविंद कांबळे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मृत गोविंद यांचा भाऊ बालाजी मोतीराम कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ६ आरोपींविरोधात दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (One person has died in Parbhani in an attack due to an argument over drinking)

गोविंद कांबळे हे १३ ऑगस्ट रोजी परभणीवरून गावाकडे आले. यावेळी ७ ते ८ दिवसापूर्वी रामभाऊ कदम, सुभाष कदम हे आखाड्यावर दारू पित असतांना रामभाऊ कदम यांच्या सोबत दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला. मात्र तो वाद सुभाष कदम यांनी जागेवरच मिटवला होता. मात्र या वादाचा राग रामभाऊ कदम यांच्या मनात होता. मयत गोविंद कांबळे हे दुचाकीवरून राहुल याच्या सोबत घराकडे येत असतांना अक्षय खिल्लारे याने मोटारसायकल आडवी लावली. व पाठीमागून मारहाण करण्यास सुरूवात केली.

रागाला डोळे नसतात! पती-पत्नीत झाला मोठा वाद, पत्नीच्या तोंडावर सिमेंटचा गट्टू फेकून मारला, पत्नीचा मृत्यू
यावेळी गोविंद हा जमिनीवर पडला असतांना गावातील अंगद खिल्लारे, अक्षय खिल्लारे, मोहन, युवराज कदम यांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. यावेळी पांडूरंग खिल्लारे आणि रामभाऊ कदम हे मारहाण करण्यास प्रोत्साहन देत होते. यामध्ये गोविंद हा गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी त्याला नांदेड येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना आज शुक्रवारी त्यांचा रोजी मृत्यू झाला.

या प्रकरणी मृत गोविंद यांचा भाऊ बालाजी कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंगद खिल्लारे, अक्षय खिल्लारे, मोहन खिल्लारे, युवराज कदम, पांडूरंग खिल्लारे, रामभाऊ कदम सर्व रा. सिंगणापुर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

अंगाचा थरकाप उडवणारी घटना; धावत्या एसटीबसचे चाक निखळले, बसमध्ये होते ४० प्रवासी
गावामध्ये पोलिसांचा फौजफाटा

गोविंद कांबळे यांना मारहाण केल्यानंतर त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईक आक्रमक झाल्यामुळे गावामध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पोलिसांच्या उपस्थितीत गोविंद कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हुंड्यातले २० हजार रुपये राहिले होते; पती छळू लागला, शेवटी ११ महिन्यांच्या मुलीला सोडून पत्नीने…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here